दिवाळीच्या तोंडावर मसाल्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर; जालन्यात ‘केएमके मसाले’च्या गोदामासह तीन ठिकाणी छापे, लाखोंचा साठा जप्त
जालना एमआयडीसी परिसरातील ‘केएमके मसाले’ या उत्पादकाच्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाने 26 ऑक्टोबर रोजी तपासणी केली. या कारवाईदरम्यान हळद पावडर आणि धने पावडरचा साठा जप्त करण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, या ठिकाणाहून 298 किलो हळद पावडर आणि 58 किलो धने पावडर जप्त करण्यात आली आहे.उत्पादनाच्या ठिकाणी अस्वच्छ वातावरण आढळणे तसेच तयार करण्यात येणाऱ्या पदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.